कोल्हापूर - मोती, खडे, रंगीबेरंगी कागद आणि कार्टुन्सचे चित्र असलेल्या राख्या सर्रास पाहायला मिळतात मात्र सम्राटनगर येथील निधी नितीन सावर्डेकर हिने खाद्यपदार्थांच्या प्रतिकृती असलेल्या थाय क्ले राख्या तयार करण्याची किमया केली आहे. लहानांसोबत मोठ्यांनाही आवडणाऱ्या पदार्थांची निवड तिने यासाठी केली आहे. पिझ्झा-बर्गर, मॅगी या पाश्चात्य खाद्यपदार्थांसोबत इडली - डोसा, वडा पाव हे भारतीय पदार्थही राख्यांवर साकारून अनोखी राखी तीने डिझाईन केली आहे.